मुंबई
सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान नुकताच मुंबई येथे प्रदान करण्यात आला. शमिका चिपकरी सध्या खेलो इंडिया खेलो या शासनाच्या उपक्रमातून पुढील प्रशिक्षण घेत आहे.जलतरण स्पर्धा यामध्ये तिने नाविन्यपूर्ण यश संपादन त्यांनी केले आहे.यावेळी यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण 2025 चां पुरस्कार वितरण सोहळा आमदार विक्रांत दादा पाटील, नामदार भारत नाना पाटील, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र राज्य संपादक महेश म्हात्रे सर, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र दिनमान चे संपादक विजय बापू चोरमारे, नवी मुंबई महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे ,महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या सचिव कविता ताई कचरे,सुनिशा शहा,प्रमोद नाना देशमाने, नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत चाळके , यशवंतराव चव्हाण फाउंडेशन अध्यक्ष संजय सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घणसोली,नवी मुंबई या ठिकाणी पार पडला.

यावेळी भारत सरकार राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (मिनिस्ट्री ऑफ स्टील) स्वतंत्र संचालक (राज्यमंत्री दर्जा) ना. भरत नाना पाटील यांच्याहस्ते क्रीडाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सिंधुदुर्ग जिल्हयामधील कु. शमिका सचिन चिपकर हिला क्रीडाक्षेत्रासाठी “यशवंतराव चव्हाण २०२५” चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमारी शमिका चिपकरचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे. हि बाब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिवानास्पद आहे. कुमारी शमिका सचिन चिपकरी सध्या गोवा येथे खेलो इंडिया खेलो मधून जलतरणचे प्रशिक्षण घेत असून त्या ठिकाणी पुढील शालेय शिक्षण घेत आहे.







