सावंतवाडी: श्री. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यांमधील समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता माजगाव-भटवाडी (ता. सावंतवाडी) येथील सिद्धिविनायक सभागृहात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणूनश्री. विक्रांत सावंत (जिल्हा परिषद सदस्य, माजगाव) असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्रा. श्री. नारायण कृष्णा साळवी (जिल्हाध्यक्ष) भूषवणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दोडामार्ग तालुका अध्यक्ष श्री. गोपाळ शेटकर करणार आहेत.प्रा. श्री. नारायण परब (रा. तळवडे) हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.याशिवाय सौ. करुणा चिंदरकर (महिला जिल्हाध्यक्ष), श्री. मनोज वाटेगावकर (युवक जिल्हाध्यक्ष) आणि सौ. माधवी भोगण (सावंतवाडी तालुका महिला अध्यक्ष) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मंडळाचे प्रदेश, कोकण विभागीय आणि जिल्हा पातळीवरील अनेक विशेष अतिथी व पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
- सकाळी ९.०० वाजता: दीप प्रज्वलन व संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन (मा. श्री. जिल्हा अध्यक्ष व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते)
- त्यानंतर: स्वागत, प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन आणि अध्यक्षीय भाषण.
- विशेष सोहळा: गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मनोगत.
- सूत्रसंचालन: श्री. महेश कुंभार (रा. मळेवाड).
- आभार प्रदर्शन: श्री. एकनाथ कुंभार (सावंतवाडी तालुका अध्यक्ष).
- दुपारी ०२.०० वाजता: स्नेहभोजन.
आपल्या समाजातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना भावी वाटचालीस प्रेरणा देण्यासाठी या सोहळ्यास सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन ‘सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी – संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.







