भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या श्रद्धा भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल;

सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. भाजपकडून (BJP) नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धाराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताना उमेदवारांना अधिकृत ‘एबी फॉर्म’ देण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धाराजे भोसले यांच्यासह सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, माजी नगरसेवक मनोज नाईक, अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,संदिप गावडे,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी राणीसाहेब श्रद्धादेवी भोसले, अजय दोंडिया, जयश्री दोंडिया, युवराज लखमराजे आदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
नगरसेवक पदासाठी दिपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, सुनीता पेडणेकर, उदय नाईक, मेघा राऊळ, मोहिनी मडगावकर, दुराली रांगणेकर, समृद्धी विर्नोडकर, प्रतीक बांदेकर, प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर, सुकन्या टोपले, ॲड. अनिल निरवडेकर, वेदिका सावंत आदींनी उमेदवारी दाखल केली.
तसेच भाजपसह पक्षातील इच्छुकांना डावलण्यात आल्यामुळे अन्नपूर्णा कोरगावकर यांनी स्वतंत्र कुळंबसमेवत येत नगराध्यक्ष पदाची अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांनी अपक्ष आणि भाजप असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांचे वडील श्रीरंग आचार्य, माजी नगरसेविका पुष्पलता कोरगावकर, व्यंकटेश शेट, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आदी उपस्थितीत होतें.
विजय भारतीय जनता पक्षाचाच होणारं !युवा नेते विशाल परब
भारतीय जनता पक्षामध्ये शिस्तीला अत्यंत महत्त्व आहे. पक्षाने दिलेला उमेदवार सामान्य कुटुंबातील असो वा राजघराण्यातील, भाजपमध्ये शिस्तीला महत्व असून पक्षाचा शब्द खाली पडू दिला जात नाही, असे स्पष्ट मत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. श्रद्धाराजे भोंसले या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
आमचे उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून, सावंतवाडीच्या विकासासाठी मेहनत घेणारे आहेत, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी भाजपने एकूण १५ जणांचे अर्ज दाखल केले आहेत. जगात, देशात, राज्यात आणि कोकणात भाजप नंबर वन होती, आहे आणि राहणार, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. अनेक वर्षांपासून विरोधी मंडळी सत्तेवर होती, परंतु आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि उमेदवारांना सावंतवाडीकर आशीर्वाद देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे ३ डिसेंबरला गुलाल हा भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला








