सावंतवाडीत १९ फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन; विविध कार्यक्रमांची मांदियाळी
सावंतवाडी:
अखिल भारतीय मराठा महासंघ, सावंतवाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवजन्मोत्सव सोहळ्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
- उद्घाटन सोहळा (सायंकाळी ५.०० वा.):
या सोहळ्याचे उद्घाटन सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष मा. श्री. सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसांगी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थांनचे युवराज मा. श्री. लखमराजे सावंतभोसले उपस्थित राहणार आहेत. - सत्कार सोहळा (सायंकाळी ६.०० वा.):
सावंतवाडी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या नवनियुक्त मराठा सदस्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. - महानाट्य/सांस्कृतिक कार्यक्रम (सायंकाळी ७.०० वा.):
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शुर शिवराया’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
आयोजक व जाहीर आवाहन
या कार्यक्रमाचे नियोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. अभिषेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
“हा सोहळा सर्व मराठा बांधवांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तरी सर्व मराठा बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या शिवजन्मोत्सव सोहळ्याची शोभा वाढवावी,” असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.







