ठळक घडामोडी

तळवडे येतील श्री पुर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया 13नोव्हेंबर रोजी

तळवडे प्रतिनिधि

तळवडे गावची येथील श्री पुर्वीदेवीचा वार्षिक जत्रोत्सव उदया 13 नोव्हेंबर २०२५ उत्साहात साजरा होणार आहे.देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित यावेळी उपस्थित राहतात.जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
या पवित्र आणि मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री पुर्वीदेवी वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. रात्रौ दशावतार नाटय प्रयोग होणार आहे. यांचा भाविकानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.