सावंतवाडी

सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे शहराच्या सर्वागीण विकासाला चालना मिळाली आहेअसे मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.आमदार दीपक केसरकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाचे कौतुक करताना सांगितले की, शहरात आधुनिक सुविधांनी युक्त भाजी मार्केटची उत्कृष्ट इमारत उभारली जात आहे. तसेच पार्किंग व्यवस्थेतही मोठी सुधारणा होणार आहे. शहराच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे भरघोस निधी उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध : श्रद्धा भोंसले
नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा दिवस सावंतवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे मिळत आहेत, नरेंद्र डोंगर येथे योगा आणि मेडिटेशन सेंटर उभारले जात आहे तसेच अनेक विकासकामांचा शुभारंभहोत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.







