ठळक घडामोडी

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा …

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

निरवडे


संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या मागचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे राज्यात वाचन संस्कृतीला बळ यावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. “घेऊया एकच वसा मराठीला बनवून ज्ञानभाषा” ही 2025 च्या वाचन प्रेरणा दिनाची मध्यवर्ती संकल्पना लक्षात घेता या दिवशी प्रशालेमध्ये विविध विद्यार्थ्यांनीमराठी भाषेत विविध पुस्तकांचे वाचन केले. तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या चरित्रावर आधारित विविध पुस्तकांचे वाचन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणाली रेडकर मॅडम यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर आधारित एक छोटीशी कथा विद्यार्थ्यांना ऐकवली. तसेच मिसाईल मॅन व भारताचे क्षेपणास्त्र संशोधनातील प्रेरणास्थान अशा शब्दामध्ये त्यांचा गौरव केला.
तसेच याच दिवशी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आधारित रॅली प्रशाळेच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी
विध्यार्थ्यानी दिलेल्या विविध घोषवाक्यानी परिसर दुमदुमत होता.
प्रशालेतील सर्व विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला.