तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के,
सावंतवाडी
तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला 100 विद्यार्थी बसले होते. सर्व विदयार्थी उत्तीर्ण झाले.
यात प्रथम क्रमांक कु हर्षदा सुरेश केरकर 94.40 %, द्वितीय क्रमांक कुं.रोशनी धोंडू कुंभार 92.20%, . तृतीय क्रमांक कु सेजल सिताराम गावडे90.00%, तृतीय क्रमांक कुं.वैष्णवी उमेश नेमण 90.00% गुण प्राप्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रतापराव देसाई तसेच शिक्षक कर्माचारी वर्ग तसेच तळवडे शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.







