ठळक घडामोडी

माजी शालेय शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या बुधवारी होणार साईपालखीचे आगमन.


गुरुपौर्णिमा निमित्त पालखी सोहळा

सावंतवाडी दि.

सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंटमध्ये उद्या दिनांक ०९/०७/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता माडखोल साईमंदिर येथून साईबाबांच्या पादुका व पालखी यांचे आगमन होणार आहे. त्याठिकाणी श्री. दीपकभाई केसरकर सपत्नीक पादुका पुजा, भाविकांसाठी पादुका दर्शन, रात्री भजन असा कार्यक्रम होणार आहे.
तसेच दिनांक १०/०७/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता पादुकांसह पालखी पायी भाविकांच्या उपस्थितीत माडखोल साईमंदिरात जाणार असून मार्गावर सर्व भाविकांना पादुका/ पालखीचे दर्शन घेता येईल.
तरी सर्व साईभक्तांनी / कार्यकर्त्यांनी दोन्ही दिवशी गुरुपौर्णिमा पादुका व पालखीच्या दर्शनाचा तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री. दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयातून कळविण्यात येत आहे.