सावंतवाडी
वेंगुर्ले तालुक्यामधील होडावडे गावात
श्री मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गेल्यावर्षी पावसाळ्यात बायोल्युमिनीकंस मशरूम म्हणजेच चमकणारी आळंबी सापडली होती. याच्या या परसबागेत याआधी हि चमकणारी अळंबी सापडली होती.या बागेत पुन्हा हि अळंबी सापडली आहे.
होडावडे येथे सापडलेली चमकणार्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली ,असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे.या चमकणाऱ्या आळंबीचे नाव मायसेना क्लोरोफॉस असून या आळंबीची नोंद 26 एप्रिल 2024 रोजी जर्नल ऑफ थ्रेडेंट टेक्सा या नियतकालिकेत प्रसिद्ध झाली आहे .
महाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यामुळे सिंधुदुर्गच्या जैवविविधतेमध्ये भर पडली असून , होडावडा गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे तसेच अभ्यासकांना पर्यावरण प्रेमी साठी या अळंबीच्या अभ्यासाची संधी मिळाली आहे.







