ठळक घडामोडी

यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिली भेट

सावंतवाडी
येत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया. यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.
आज बुधवारी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी मोठ्या जल्लोषात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, राजू शेटकर, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, रमेश गावकर, शैलेश गावंडळकर, सीमा मठकर, नम्रता झारापकर, श्रृतिका दळवी, रमेश सावंत, शब्बीर मणियार, फिलीप्स रॉडिक्स, साई काणेकर, आबा केरकर, विनोद काजरेकर प्रशांत बुगडे, निशिकांत तोरसकर, आशिष सुभेदार, प्रमोद सावंत, समीरा खलील, उदय अळवणी, गोकुळदास मोटे, वाडकर व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
श्री वैभव नाईक म्हणाले, यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल. आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी व प्रवाह बाहेर गेलेल्यांना एकत्र करून संघटना वाढविली जाईल. लवकरच विभागीय बैठका घेतल्या जातील आणि शिवसैनिकांचे प्रश्न सोडविले जातील असे श्री. नाही यावेळी म्हणाले. जिल्ह्यात लवकरच हत्ती हटाव मोहिमेबद्दल आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी श्री. वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सत्कार केला. त्यानंतर वैभव नाईक यांनी उपस्थित शिवसैनिकांशी चर्चा केली. यावेळी बाळा गावडे, चंद्रकांत कासार, निशिकांत तोरसकर. रमेश गावकर, राजू शेटकर यांनी मार्गदर्शन केले.