ठळक घडामोडी

आडेली येते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांच्या हस्ते संपन्न झाला सोहळा

वेंगुर्ला

आडेली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावात देण्यात आली.

या सोहळ्यावेळी वेंगुला पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर , श्रीमती यशस्वी कोंडसकर (आडेली सरपंच),विष्णू कोंडसकर, विनय पालकर ,पांडुरंग आडेलकर, वर्षा आडेलकर ,रमेश आडेलकर, उदय आडेलकर ,तानाजी आडेलकर, किशोर आडेलकर ,स्वप्निल आडेलकर तसेच मोठ्या प्रमाणात अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविकउदय आडेलकर यांनी केले तर आभार सुमेध काळसेकर यांनी मानले.