ठळक घडामोडी

जनता विकासालाच साथ देईल, तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांचा विश्वास

‘जनता विकासालाच साथ देईल, ; संदीप गावडे यांचा विश्वास

सावंतवाडी | प्रतिनिधी

“मी आतापर्यंत कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेली नाही. ही निवडणूक मी शेवटपर्यंत केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढलो आहे. त्यामुळे सुज्ञ जनता विकासाच्या बाजूने उभी राहून मला साथ देईल,” असा ठाम विश्वास तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संदीप गावडे यांनी व्यक्त केला. आज तळवडे येते मतदान केंद्रावर भेटी दरम्यान पत्रकाराशी त्यांनी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना गावडे यांनी विरोधकांवर
संदीप गावडे पुढे म्हणाले की, “विरोधकांकडे मांडण्यासाठी कोणतेही ठोस विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रचारादरम्यान केवळ खालच्या स्तरावर जाऊन टीकाटिप्पणी करणे आणि लोकांमध्ये ‘फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचेच काम केले आहे. मात्र, अशा प्रवृत्तीला जनता आता थारा देणार नाही.”
‘लोकसभा-विधानसभेप्रमाणेच निकालाची पुनरावृत्ती होईल’
विरोधकांना टोला लगावताना ते म्हणाले की, “ज्यांनी केवळ टीकेचे राजकारण केले, त्यांना जनतेने यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नाकारले आहे, त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही नाकारले आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही जनता त्यांना धडा शिकवेल आणि पुन्हा एकदा त्यांना विरोधी बाकावरच बसवेल.” निवडणुकीत केवळ विकासकामांवर भर दिल्याचे स्पष्टीकरण केलें. वैयक्तिक आरोपांपेक्षा कामाला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले . आज मतदान केंद्रावर भेटी दरम्यान त्यांनी मत व्यक्त केले.