ठळक घडामोडी

कोकणकरांच्या सेवेसाठी ‘शिवसेना एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना-आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस कुडाळच्या दिशेने रवाना

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कुडाळकडे विशेष रेल्वे; चाकरमान्यांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर करण्याचा उपक्रम

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस कुडाळच्या दिशेने रवाना

गणेशोत्सवासाठी मुंबईहून कुडाळकडे विशेष रेल्वे; चाकरमान्यांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर करण्याचा उपक्रम

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस कुडाळच्या दिशेने रवाना

मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणकरांना आपल्या गावच्या मातीची ओढ लागली आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या मायभूमीकडे जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास मोफत, सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी दादर रेल्वे स्थानकातून ही विशेष रेल्वे कोकणच्या दिशेने रवाना झाली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ‘शिवसेना एक्सप्रेस’ला कुडाळच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले.

यावेळी रेल्वे स्थानकावर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने कोकणवासी नागरिक उपस्थित होते. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी घट्ट जोडलेला सण आहे. मुंबईतील धकाधकीचे जीवन मागे सोडून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा प्रवास केवळ रेल्वेचा प्रवास नसून आपल्या मातीशी पुन्हा नाते जोडणारा भावनिक सेतू आहे.

दरवर्षी रोजगारासाठी मुंबईत राहणाऱ्या असंख्य कोकणकरांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांसोबत आणि ग्रामदेवतेच्या चरणी जाता यावे, यासाठी करण्यात आलेली ही विशेष व्यवस्था चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.

‘शिवसेना एक्सप्रेस’च्या रवाना प्रसंगी कोकणवासीयांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आपल्या गावच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर गणेशोत्सवाच्या आनंदासोबतच मायभूमीच्या भेटीचा उत्साह स्पष्टपणे दिसून आला.