ठळक घडामोडी

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले!जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले!

सावंतवाडी,

येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी रामचंद्र (आबा) दळवी, जिल्हाध्यक्ष इरशाद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्हा प्रभारी आबा दळवी यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या –प्रत्येक गावनिहाय आणि नगरपरिषद वॉर्डनिहाय स्वतंत्र जबाबदारी निश्चित करावी,
सर्व ग्राम व वार्ड कमिट्यांची तसेच सेल्सची नियुक्ती करून पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करावा.
“निवडणुकीला सर्व ताकदीनिशी काँग्रेस कार्यकर्ते उभे राहतील, याची हमी आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीने देतो,” असे ठाम आश्वासन दळवी यांनी दिले.
सुमारे ५ ते ६ तास चाललेल्या या बैठकीत तालुक्यातील व शहरातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. बैठकीला उपस्थित प्रमुखांमध्ये तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, ज्येष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर यांच्यासह ऍड. संभाजी सावंत, प्रकाश बांदेकर, सुधीर मल्हार, स्मिता टिळवे, आमिदी मिस्त्री, जास्मिन लक्ष्मेश्वर, कौस्तुभ पेडणेकर, आनंद कुंभार, विनोद मल्हार, प्रतीक सावंत, आबा मांजरेकर, कृष्णा धाऊसकर, प्रतीक्षा भिसे, माया चिटणीस, समीर भाट, शाहरुख खान, सुभाष नाईक, अभिजीत जाधव, संजय लाड, विल्यम सालदाना, हर्षवर्धन धारणकर, रफिया नाईक, ज्ञानेश्वर पारधी, संतोष मडगावकर, विजय ओटवणेकर, रुपेश आईर, संतोष तावडे, संतोष कासकर आदींचा समावेश होता.
या बैठकीतून काँग्रेसने तालुक्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी राजकीय समीकरणांना ही बैठक दिशा देणारी ठरणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.