ठळक घडामोडी

कृषी विभागाच्या विविध योजना व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवा -सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत-सावंतवाडी येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन

सावंतवाडी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्यामार्फत मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी कृषी महोत्सव कार्यक्रम राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी येथे पार पडला.

सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सावंतवाडी तालुक्याचे पंचायत समिती सभापती सुष्मिता जाधव , तसेच सावंतवाडी ,दोडामार्ग ,कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, सावंतवाडी पंचायत समिती गट विकास अधिकारी वासुदेव नाईक , डॉ.वैभव शिंदे प्रमुख फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला, महिला आर्थिक विकास महामंडळ सावंतवाडी अध्यक्ष भक्ती दळवी व उपाध्यक्ष मिताली राऊळ , श्री आप्पासाहेब पाटील तंत्र अधिकारी उपस्थित होते .

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांनी कृषी महोत्सव कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व अशा कृषी विभागाच्या विविध योजना व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या, यावेळी विविध शेती तज्ञांची उपस्थिती होती .श्री सचिन चोरगे, संचालक अग्रीकार्ट यांनी विविध पिकातील स्थानिक वाण व संवर्धन त्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली . श्री तानाजी सावंत यांनी स्थानिक शेतमाल विक्री व्यवस्थापन व गावठी बाजार याविषयी माहिती दिली ,डॉ.वैभव शिंदे सहयोगी संशोधन संचालक प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला यांनी मसाला पिकाचे लागवड तंत्रज्ञान, डॉ.विनया बाड यांनी पौष्टिक तृणधान यांचे आहारातील महत्त्व तसेच डॉ. मृणाल सावंत यांनी स्त्रियांचे आरोग्य व आहार व योगेश वालावलकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, कृषी महोत्सव कार्यक्रम ठिकाणी शेतकऱ्यांची महाविस्तार AI ॲप वर नोंदणी तसेच विविध फळपिके, फुलपिके ,भाजीपाला ,पौष्टिक तृणधान्य नमुनांची आकर्षक मांडणी केली होती . पौष्टिक तृणधान्य यांनी बनवलेली रांगोळी व उतरंड यांनी कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेधून घेतले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती तसेच कृषी यांत्रिकीकरण मधील विविध शेती अवजारांचे प्रदर्शन, विविध स्थानिक वाण, प्रक्रिया केलेल्या विविध कृषी उत्पादनांची थेट विक्री शेतकरी ते ग्राहकपर्यंत केली . कृषी विषयक कंपन्यांचे विविध स्टॉलला शेतकऱ्यांनी भेट दिली व उत्पादनाची माहिती घेतली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गोरखनाथ गोरे तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी ,श्री भास्कर चौगुले तालुका कृषी अधिकारी कुडाळ, श्री मंगेश चव्हाण तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ला, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र पाटील तंत्र अधिकारी,
श्री .सौरभ कदम तालुका कृषी अधिकारी दोडामार्ग व त्यांचे अधिनस्त सर्व मंडळ कृषी अधिकारी , उपकृषी अधिकारी , सहाय्यक कृषी अधिकारी, बीटीएम, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी. यांनी परिश्रम घेतले .

कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिकेत कदम उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी यांनी केले . तर सूत्रसंचालन श्री यशवंत गव्हाणे व आरती आजगावकर व आभार प्रदर्शन रविंद पाटील यांनी केले.