ठळक घडामोडी

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखीचे भक्तिभावाने पूजन! गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत भक्तिमय वातावरण! साईभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती


सावंतवाडी | प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी येथे श्री साई पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मंगळवारी सायंकाळी श्री साई पालखीचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील निवासस्थानी आगमन झाले.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत केले. त्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखी व श्री साईबाबांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी साईनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
या पूजन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. नीता कविटकर-सावंत, शहरप्रमुख खेमराज कुडतरकर, जिल्हा परिषद सदस्या सुधा कडवणकर, माजी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तसेच आबा केसरकर, गजानन नाटेकर, सुभाष गावडे, विश्वास धाग, सुरेश सावंत, अर्चित पोकेळे, महादेव राऊळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, बुधवार, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्री साई पालखी माडखोलकडे प्रस्थान करणार असून, या पवित्र पालखी सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.