ठळक घडामोडी

होडावडेत आज रंगणार सहावी ‘स्वरगंध संगीत मैफिल’; सुरांच्या बरसातीने रसिकांना मिळणार अविस्मरणीय संगीतानुभव!

होडावडे :

संगीतप्रेमी रसिकांसाठी आज, गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी होडावडे येथे सहाव्या ‘स्वरगंध संगीत मैफिली’चे आयोजन करण्यात आले आहे. सुरांची बरसात आणि संगीताची अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळणार आहे.

या संगीत मैफिलीत गायक कलाकार कु. कौस्तुभ धुरी आणि श्री. युसुफ आवटी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना हार्मोनियमवर श्री. गजानन मेस्त्री, तबल्यावर श्री. अक्षय सरवणकर आणि तालरक्षक म्हणून श्री. सागर सावळ यांची साथ लाभणार आहे.

कार्यक्रमाचे निवेदन श्री. आडेलकर सर करणार असून ध्वनी संयोजनाची जबाबदारी श्री. रामकृष्ण मेस्त्री (शुभम साउंड) सांभाळणार आहेत.

ही संगीत मैफिल आज सायंकाळी ठीक ६.३० वाजता होडावडे बाजारपेठ येथील पै यांच्या दत्त मंदिरात पार पडणार आहे.

संगीतप्रेमींनी या सुरेल मैफिलीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

स्वरांची साथ, सुरांची बरसात आणि संगीताचा अविस्मरणीय आनंद… चला, अनुभवूया स्वरगंध संगीत मैफिल!