सावंतवाडी
सावंतवाडी येथील नवसरणी केंद्र येथे शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार निरंजन डावखरे , कास्ट्राईब संघटनेचे राज्य अध्यक्ष आकाश तांबे,राज्य सरचिटणीस रविंद्र पालवे, कार्याध्यक्ष किरण मानकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत समग्र शिक्षा सावंतवाडी चे विषयतज्ज्ञ श्री. महेंद्र चव्हाण यांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. श्री महेंद्र चव्हाण यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








