सावंतवाडी,ता.०७:
वेंगुर्ला तालुक्यांतील आडेली पंचायत समिती मतदार संघातील महायुतीचे पाठींबा असलेले अधिकृत उमेदवार नितीन मांजरेकर यांनी आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब सहपरिवार बजावला.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपल्या पंचायत समिती मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहीती घेतली. मी या भागातील जनतेचा समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक पणे काम करणार आहे. तसेच अनेक विकास काम केली आहेत.त्यामुळे इथली जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील. व आपला विजय होइल असे ते यावेळी म्हणाले.







