सावंतवाडी
भाजप व शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. आमच्या पार्टीचा नारा हा शतप्रतिशत भाजपचा आहे. उमेदवार वगैरे हा नंतरचा विषय आहे. त्यात जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत आमच्या पक्षाला मिळणारं यश व संघटनात्मक बांधणी पहाता तिन्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा कमळ निशाणीवर लढलाच पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता ही वस्तुस्थिती आहे., वरचेवर अशीच परिस्थिती असते. त्यामुळे कोल्हापूर मेडिकल कॉलेजचे डॉक्टर्स कणकवली, देवगड परिसरात येतात. त्याप्रमाणे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला येथील रूग्णालयात गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर द्यावेत अशी मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्ह्याचा आरोग्य परिस्थितीची गंभीर दखल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली असून महिनाभरात येथील परिस्थिती बदलेल, अशी माहिती त्यांनी दिली.आंबोली-सावंतवाडी रस्ता दुरावस्थेस जबाबदार ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.







