कणकवली :
कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवा. त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी आणून देतो, अशी ग्वाही खासदार नारायण राणे
यांनी आज दिली.
कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. राणे यांनी रेल्वे स्थानके सुशोभिकरण कामाचे श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेला दिले. तसेच श्री. चव्हाण यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे असे श्री. राणे म्हणाले.
कणकवली रेल्वेस्थानक लोकार्पण कार्यक्रमावेळी आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर के हेगडे ,सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, अॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अशक्य जन समूदाय उपस्थित होते.







