सावंतवाडी येथील
राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग शाखेतर्फे व राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग या मार्फत महिला दिनानिमत्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी हा सत्कार अँड निता सावंत कविटकर, यांच्या हस्ते स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आला, यावेळी जान्हवी राऊळ,रूपाली देसाई,साक्षी तळवणेकर,जूईली पांगम,साक्षी रामदुरकर, दर्शना राणे, सुमित्रा परब, रूक्मिणी परब,अनघा नार्वेकर,अबिधा शेख, निर्मला लठ्ठे,गीता पारधी, कृष्णाई भिसे, अंकिता माळकर, प्रतिमा माळकर,यांना स्त्री नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सावंतवाडी शाळा नंबर 4 अंगणवाडी मुलांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.व त्यावेळी 3 क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक शिवांश संदिप पाटील ,लोकमान्य टिळक यांची वेशभूषा, द्वितीय क्रमांक वेद गौरेश नातू शिवाजीची वेशभूषा, तृतीय क्रमांक तेजल दिपक सावंत झाशीची राणी वेशभूषा, यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मुलांचं कौतुक केलं. महिलांना उद्योग धंदा या विषयावर माहिती सांगितली. जानवी राऊळ यांनी आमच्या संघटनेसाठी वीस खुर्च्या भेट म्हणून दिल्या. आणि काही मदत लागेल तर आम्ही करू असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम वेळी जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनी संघटने विषयी माहिती सांगितली.
यावेळी कार्यक्रमाला यतीन गावडे यांनी विश्वकर्मा योजनेची माहिती सांगितली व 50 फॉर्म भरून घेतले . यावेळी महिला निकीता परब संचिता गावडे, पुजा गावडे,सेजल पेडणेकर,संगीता पारधी,मानसी पाटील, अंकिता सावंत, मनीषा गावडे, सरिता भिसे,अक्षता कुडतरकर,आरोही गवस ,उपस्थित होत्या, व हळदीकुंकू वाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार निकीता परब यांनी मानले.







