केसरकर-राणे भेटीनंतर सिंधुदुर्गच्या युतीचा सस्पेन्स वाढला.! माजी मंत्र्यांनी टाकला ‘गुगली’, फैसला आता वरिष्ठ नेते याच्याकडून मुंबईतुन होणारं
सिंधुदुर्ग युतीचा चेंडू आता भाजपच्या कोर्टात! केसरकर ‘पॉझिटिव्ह’, वरिष्ठांच्या निर्णयाकडे लक्ष
सिंधुदुर्ग:
जिल्ह्यातील राजकारणात सध्या युतीसंदर्भातील चर्चांनी जोर धरला असून, माजी मंत्री दीपक केसरकर यांनी यासंबंधी मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. जिल्ह्यामध्ये युती करण्याबाबत मी ‘पॉझिटिव्ह’ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या युतीसंदर्भात अंतिम निर्णय आता पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असं सांगून केसरकर यांनी राजकीय चर्चांना नवं वळण दिलं आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा
युतीबाबत सकारात्मकता दर्शवल्यानंतर,
नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांची आमदार दिपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीमध्ये माजी आमदार प्रमोद जठार आणि जिल्यातील भाजप नेते यावेळी उपस्थित होते. ही भेट युतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
या भेटीत महायुतीतील दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीच्या समीकरणांवर जोरदार विचारमंथन सुरू झाले आहे.
या भेटीत महायुतीतील दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. या चर्चेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा युतीच्या समीकरणांवर जोरदार विचारमंथन सुरू झाले आहे.
‘गुगली’ने वाढवली उत्सुकता:
अंतिम निर्णयावर सर्वांचे लक्ष केसरकर यांच्या या विधानामुळे युतीचा निर्णय घेण्यासाठी आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लक्ष लागले आहे. “युतीसाठी मी पॉझिटिव्ह आहे,” असं सांगून त्यांनी एकाप्रकारे युतीचा ‘चेंडू’ भाजपच्या पारड्यात टाकला आहे. युती होणार की नाही, यासंदर्भातील अंतिम निर्णयावर आता सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
केसरकर यांच्या या ‘गुगली’मुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हं दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील महायुतीचे भविष्य आता वरिष्ठ पातळीवरील निर्णयावर अवलंबून असेल. युती झाल्यास स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान असेल.