सावंतवाडीत आज रंगणार पारंपरिक दशावतार: ‘उघडले स्वर्गाचे दार’ नाटकाचे आयोजन
सावंतवाडी:
शहरातील सर्वोदयनगर रहिवाशी संघाच्या वतीने आज, मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य पारंपरिक दशावतार नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यावेळी ‘उघडले स्वर्गाचे दार’ हा नाट्यप्रयोग सादर करणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
- वेळ: आज सायंकाळी ठीक ७.०० वाजता.
- स्थळ: सर्वोदयनगर गार्डन, पाटणकर गॅस गोडाऊन जवळ, सावंतवाडी.
दिग्गज कलाकारांचा सहभाग:
या नाट्यप्रयोगात दशावतार क्षेत्रातील नामांकित कलाकार आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री. केशव खांबल, कु. यश जळवी, श्री. अमित गवस,श्री. सचिन कोचरेकर, श्री. संतोष गावस, श्री. भगवान नाईक,श्री. विठ्ठल गांवकर, कु. साहिल राणे, श्री. नवनाथ गावस व श्री. सुखदेव राऊळ. हे आहेत. - सावंतवाडी परिसरातील आणि सर्वोदयनगरमधील रसिक प्रेक्षकांनी या कलेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रहिवाशी संघाचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, उपाध्यक्ष तथा नगरसेवक श्री. अजय गोंदावळे आणि सेक्रेटरी सौ. मेघना प्रकाश राऊळ यांनी केले आहे.







