ठळक घडामोडी

संपर्क फाउंडेशन स्मार्ट स्कूल आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित उत्कृष्ट शिक्षक, शाळा आणि तालुका पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न

संपर्क फाउंडेशन स्मार्ट स्कूल आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित उत्कृष्ट शिक्षक, शाळा आणि तालुका पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न

सिंधुदुर्ग


संपर्क फाउंडेशन आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा कार्यक्रमांतर्गत पुरस्कार सोहळा यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 उत्कृष्ट तालुके, 21उत्कृष्ट शाळा आणि 31 उत्कृष्ट शिक्षक यांची निवड करून सर्वांना सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट, बॅग आणि थँक्यू कार्ड प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीम. तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान *श्री. गणपती कमळकर (शिक्षणाधिकारी), जिल्हा परिषद यांनी भूषवले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला संपर्क फाउंडेशनचे डेप्युटी स्टेट हेड *श्रीम. मयुरी कुलकर्णी* व *श्री. महेश होले (झोनल मॅनेजर) यांचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे यांनी नवनवीन टेक्नॉलॉजी चा वापर शिक्षकांनी अध्यापनातं वाढवावा असे सर्वाना संबोधित केले.
ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली करत संपर्क फाउंडेशनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षणाच्या डिजिटल युगाला नवी दिशा दिली आहे. असे प्रतिपादन प्रा. शिक्षणाधिकारी मा. श्री. कमळकर सर यांनी दिले.

आजपर्यंत जिल्ह्यातील तब्बल 491 शाळांमध्ये संपर्क फाउंडेशन कार्यरत असून 604 संपर्क टीव्ही डिवाइस आणि 229 एलईडी टीव्ही शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संपर्क फाउंडेशन तर्फे शाळांमध्ये बसविण्यात आलेले संपर्क टीव्ही डिवाइस हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. वर्ग १ ते ५ पर्यंतचा SCERT संलग्न अभ्यासक्रम या डिवाइस मध्ये उपलब्ध असून यात गणित, इंग्लिश फाउंडेशन आणि इंग्लिश टेक्स्ट बुक या विषयांचा समावेश आहे.
या आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना अवघड विषयसुद्धा सोप्या आणि रोचक पद्धतीने समजत आहेत. चित्रफिती, अ‍ॅनिमेशन आणि डिजिटल साधनांचा वापर करून संकल्पना स्पष्ट होत असल्याने विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढली आहे. स्वाध्याय व पुनरावृत्ती सुलभ होत असल्याने अभ्यास अधिक परिणामकारक ठरत आहे असे मत सावंतवाडी केंद्रप्रमुख श्री. वालावलकर सर यांनी मांडले.

ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये संपर्क टीव्ही डिवाइस मुळे शिक्षण अधिक समजण्यासारखे, दर्जेदार आणि आधुनिक झाले आहे. पारंपरिक अध्यापन पद्धतीसह डिजिटल साधनांची जोड देऊन संपर्क फाउंडेशनने स्मार्ट शाळा संकल्पनेला बळकट केले आहे. उत्कृष्ट तालुका पुरस्कारप्राप्त श्री. नदाफ सर गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग यांनी केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. रोशनी गोसावी (जिल्हा समन्वयक) यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंधुदुर्ग टीममधील समीर घाडी तसेच आय स्पार्क योगेश मेतर व अभिषेक जोशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.