सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्रींचे निधन
वेंगुर्ला:
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्या मातोश्री आणि होडावडे येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (वय ७९) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती, अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
साध्या आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाचा अंत
श्रीमती लक्ष्मीबाई कुडाळकर या अत्यंत साध्या आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती आणि कुडाळकर कुटुंबाचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. होडावडे पंचक्रोशीतील नागरिक आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीबाई कुडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.







