ठळक घडामोडी

बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

बिगुल वाजले ; 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

मुंबई

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. गेली अडीच ते तीन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. परंतु ,आता आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात नगरपरिषद, नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींकरिता ही निवडणूक होणार अशी माहिती निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली आहे.

नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत -17 नोव्हेंबरनामनिर्देशन छाननी कार्यक्रम -18 नोव्हेंबरअपील नसल्यास माघारीचा दिवस -21 नोव्हेंबरअपील असल्यास माघारीचा दिवस- 25 नोव्हेंबरनिवडणूक चिन्ह व अंतिम यादी जाहीर करण्याचा दिवस- 26 नोव्हेंबरप्रत्यक्ष मतदान दिनांक- 2 डिसेंबरप्रत्यक्ष मतमोजणी व निकाल दिनांक 3 डिसेंबर