ठळक घडामोडी

वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,

वेंगुर्ल्यात महायुतीचा झंझावात; पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व,,! तर आडेली पंचायत समिती मतदार संघात नितीन मांजरेकर व तुळस जिल्हा परिषद मतदार संघात अपक्ष उमेदवार सुजाता पडवळ विजयी

वेंगुर्ले, ता. ०९:

वेंगुर्ला तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक यश संपादन करत तालुक्यावर आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.

पंचायत समितीमध्ये महायुतीने विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साफ केला असून १० पैकी तब्बल ९ जागांवर ताबा मिळवला आहे.
जिल्हा परिषद: चुरशीची लढत
तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांपैकी महायुती आणि उबाठा गट यांच्यात विभागणी झाली असून निकाल खालीलप्रमाणे राहिले:

  • महायुती: २ जागा
  • उबाठा गट: २ जागा
  • अपक्ष: १ जागा

महत्त्वाचे निकाल:

  • म्हापण: महायुतीच्या यज्ञा साळगावकर यांनी ३७५६ मते मिळवत २२ मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवला.
  • आडेली: उबाठा गटाचे विजय नाईक ४५०० मते मिळवून विजयी झाले.
  • तुळस: अपक्ष उमेदवार सुजाता पडवळ यांनी ३७०० मते घेत महायुती व उबाठाला धक्का दिला.
  • उभादांडा: उबाठाचे संजय गावडे ४३२२ मते मिळवून विजयी झाले.
  • रेडी: भाजपचे प्रितेश राऊत ३३४४ मते मिळवून विजयी झाले.

पंचायत समिती: महायुतीची एकहाती सत्ता
पंचायत समितीच्या १० जागांपैकी ९ जागांवर महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही.
विजयी उमेदवार:

  • आसोली: भाजपने ही जागा आधीच बिनविरोध जिंकली होती.
  • म्हापण: विष्णू उर्फ आपी फणसेकर (भाजप) – १७१४ मते.
  • परुळे: सचिन देसाई (शिंदे सेना) – २१८४ मते.
  • वायंगणी: शितल राऊत (भाजप) – २३८४ मते.
  • रेडी: प्रियांका घाटवळ (भाजप) – २४५६ मते.
  • उभादांडा: साक्षी नार्वेकर (शिंदे सेना) – २१८८ मते.
  • मातोंड: शंकर घारे (भाजप) – १५८८ मते.
  • तुळस: सुचिता वजराठकर (शिंदे सेना).
  • आडेली: नितीन मांजरेकर (महायुती पुरस्कृत अपक्ष).
  • शिरोडा: योगिता परब-मसुरकर (अपक्ष).
    गुलालाची उधळण आणि जल्लोष
    निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. निकाल स्पष्ट होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालय परिसरात गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष केला.