ठळक घडामोडी

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सावंतवाडी

15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय श्री डॉ.शेखर जैन सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय हिंद’ च्या घोषणा देत परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने दंग झाला.


यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांच्या तालावर विविध कवायत प्रकार सादर केले.


देशभक्तीपर गीते, नृत्य आणि नाटिका सादर करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर भाषणे दिली. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी जवळच्या परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढली .


या कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी व माता पालक संघाचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
अशाप्रकारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला.