जी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे.









