वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यांत मुसळधार पाऊस व वादळ यामुळे मंगळवारी होडावडे तळवडे पंचकोशीच मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होऊन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होडावडे या ठिकाणी देऊळवाडी भागात दोन कुटुंबीयांच्या घरावर झाडाचे वृक्ष उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नाईक कुटुंबीय यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .

मात्र यामध्ये कोणते जीवन जीवितहानी झाली नाही. होडावडे येथील मनोहर नाईक तसेच महादेव नाईक यांच्या घरावर वृक्ष पडले. घराचे नुकसान झाले आहे. सध्या जोरदार वादळी वारा पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे.








