ठळक घडामोडी

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!

अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ
‘एक सदस्य, एक झाड’ लावून जगवण्याचा महिलांचा पर्यावरणपूरक संकल्प

सावंतवाडी | प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत येथील अनमोल प्रभागसंघा’ची आर्थिक वर्ष २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सिद्धेश्वर हॉलमध्ये प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेमध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती देण्यासाठी ‘अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज योजनेची मर्यादा ५० हजारांवरून थेट १ लाख रुपये करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.

सभेची सुरुवात पारंपरिक पद्धतीने प्रार्थना, राज्यगीत आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रभागसंघाच्या अध्यक्षा विशाखा ठाकूर यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावर सचिव रंजना तेली, कोषाध्यक्ष संगीता राऊळ यांसह कार्यकारी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.तसेच, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव तालुका अभियान कक्षातून व्यवसाय व्यवस्थापक (BM IBCB) स्वाती रेडकर यांच्यासह कॅडरमधील ग्रामसखी, प्रेरिका, बीडीएसपी, बँक सखी, पशु सखी आणि सर्व ग्रामसंघ लिपिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रभागसंघाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सचिव रंजना तेली यांनी सभेचे प्रास्ताविक केले. तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून ते सर्वानुमते कायम करण्यात आले. अनमोल प्रभागसंघाच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या वार्षिक अहवालाचे दिमाखदार अनावरण सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कोषाध्यक्षांनी वर्ष २०२५-२६ चा जमा-खर्च व उत्पन्न विवरण स्पष्ट केले, त्याला सभेने मंजुरी दिली. त्यानंतर आगामी वर्ष २०२६-२७ चा ताळेबंद आणि अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

या सभेत प्रभागसंघाची पुढील पाच वर्षांची उद्दिष्टे निश्चित करताना *व्हिजन डॉक्युमेंट्स’ प्रभागसंघाचा AAP आणि ‘BDP’स्पष्ट करून त्याला मंजुरी देण्यात आली. आर्थिक प्रगतीसोबतच निसर्गाचे रक्षण करण्यासाठी ‘एक सदस्य, एक झाड’ लावून ते केवळ लावणेच नव्हे तर जगवण्याचा अनोखा संकल्प सर्व महिलांनी केला.

“लखपती दीदी आणि शाश्वत उपजीविकेवर भर”

सभेमध्ये आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समूह, ग्रामसंघ आणि कॅडरचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रभाग समन्वयक सचिन नाईक यांनी प्रभागसंघाच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत पुढील धोरणे मांडली. स्वाती रेडकर यांनी सामाजिक समावेशन, ‘लखपती दीदी’ आणि शाश्वत उपजीविका या विषयांवर महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुण्या सभापती यांनी सुस्मिता जाधव यांनी महिलांचे आरोग्य, स्वच्छता, अंदाजपत्रकाचे नियोजन आणि प्रभागसंघाच्या भविष्यकालीन धोरणांवर सविस्तर मार्गदर्शन केले व प्रभागसंघाच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सभेचे नेटके सूत्रसंचालन प्रभागसंघ लिपिका वैभवी खडपकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणानंतर सचिव रंजना तेली यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी ‘वंदे मातरम’ राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.