सावंतवाडीत संजू परब यांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून प्रत्यक्ष भेट घेत अभिनंदन
सावंतवाडी:
नुकत्याच पार पडलेल्या सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत विजय संपादन केला. संजू परब यांचा हा विजय म्हणजे त्यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या कामावर जनतेने टाकलेला विश्वासाचा स्पष्ट कौल असल्याचे मानले जात आहे.
या यशाबद्दल कुडाळ-मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे यांनी संजू परब यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांनी परब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील सामाजिक तसेच विकासात्मक वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.जनतेच्या विश्वासाची पावती सावंतवाडी शहराच्या राजकारणात संजू परब यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. निवडणुकीच्या निकालातून मतदारांनी त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले असून, शहराच्या विकासासाठी हा विजय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमदार निलेश राणे यांनी यावेळी बोलताना, “हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि संजू परब यांच्या जनसंपर्काचा परिणाम आहे,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.
या सदिच्छा भेटीच्या प्रसंगी श्री. विद्याधर परब (संचालक, जिल्हा बँक)श्री. प्रितेश राऊळ (माजी सभापती, जिल्हा परिषद),श्री. भूषण सारंग यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत संजू परब यांच्या विजयाचे स्वागत केले. आगामी काळात सावंतवाडी शहराच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी संजू परब यांनी दिले.







