ठळक घडामोडी

तळवडे अर्बन को ऑप क्रे.सोसा.लि.तळवडे रौप्यमहोत्सव सोहळा २० ऑगस्ट रोजी

तळवडे

तळवडे अर्बन बँक ऑफ. कॉ. क्रे. सो. लि., तळवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रम आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, २० ऑगस्ट रोजी २०२५ साय ५.३० वाजता सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स, तळवडे येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून दीपक केसरकर, आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदार संघ तथा माजी शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनीष प्रकाश दळवी, अध्यक्ष, सि. जि. म. सहकारी बँक आणि अतुल सुधाकर काळसेकर, उपाध्यक्ष, सि. जि. म. सहकारी बँक हे असणार आहेत.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यात दिपाली माळी, जिल्हा प्रबंधक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड); बाळ परब, जिल्हा उपनिबंधक स. सं. सिंधुदुर्ग; सुजय संभाजी कदम, सहायक नि. स. सं. सावंतवाडी; आर. टी. चौगुले, सा. नि. सं. प्रथम श्रेणी अधिकारी, वेंगुर्ले; विद्याधर रविंद्रनाथ परब, संचालक सि. जि. म. स. बॅं. लि.; प्रमोद मधुकर गावडे, मुख्य कार्या. अधि. सि. जि. म. स. बॅं. लि.; डॉ. प्रसाद देवधर, भगीरथ प्रतिष्ठान, झाराप; प्रमोद रामचंद्र गावडे, अध्यक्ष, सावंतवाडी ता. खरेदी विक्री संघ; आत्माराम भि. राऊळ, अध्यक्ष, सहकारी कौल कारखाना, नेमळे; सुनील राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सैनिक पतसंस्था; बाबूराव दत्ताराम परब, चेअरमन, तळवडे विकास सोसायटी; सौ. वनिता मेस्त्री, सरपंच, ग्रामपंचायत तळवडे; उदय परब, अध्यक्ष, व्यापारी संघटना तळवडे आणि सुनील परब, देवस्थान प्रमुख गावकर, तळवडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष विलास का. परब, अध्यक्ष तळवडे अर्बन बँक आणि नारायण सा. परब, उपाध्यक्ष तळवडे अर्बन बँक तसेच विनोद गु. वराडकर, व्यवस्थापक आहेत. यावेळी सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी, यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी संस्था सभासद, तळवडे अर्बन ऑफ. कॉ. क्रे. सो. लि., तळवडे चे उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व ग्रामस्थ हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.