ठळक घडामोडी

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास
‘माझं व्हिजन केवळ विकास’; पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीकास्त्र

सावंतवाडी | प्रतिनिधी
“निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून मतदारांना भुलवण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी धनशक्तीसमोर जनशक्तीचाच विजय होईल. , ज्याचे उत्तर आता जनता मतपेटीतून देणार आहे,” असा घणाघाती आरोप अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी केला.
सावंतवाडी येथे आयोजित विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या आगामी वाटचालीबद्दल सविस्तर भूमिका मांडली.
हुकूमशाही आणि दादागिरी मोडीत काढणार
डिसोजा पुढे म्हणाले की, “माझे संपूर्ण लक्ष केवळ मतदारसंघाच्या विकासावर केंद्रित असून मला कोणावरही वैयक्तिक टीका करण्यात रस नाही. मात्र, विरोधकांकडून सध्या सुरू असलेली हुकूमशाही आणि दादागिरीची संस्कृती मोडीत काढण्याची वेळ आता आली आहे. केवळ आकड्यांचे फुगवून दावे करून कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही, हे येत्या ९ तारखेला निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.”
मतदारसंघातील सुज्ञ मतदार यावेळेस योग्य निर्णय घेतील विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासाचे ठोस ‘व्हिजन’ घेऊन आपण मैदानात उतरलो असून जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला मेघश्याम काजरेकर, शिवदत्त घोगळे, राकेश पवार यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.