ठळक घडामोडी

राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्गकडून शिक्षक, विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांचा करण्यात येणार सत्कार

राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्गकडून शिक्षक, विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांचा करण्यात येणार सत्कार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी):
राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या वतीन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरस्वती पूजनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 सावंतवाडी मधील आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी सत्कार आणि शिष्यवृत्ती वितरण तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
आदर्श शिक्षक, विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांचा गौरव
संस्थेच्या या उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षिका आणि मुख्याध्यापक सत्कारआदर्श शिक्षिका: श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण धारगावकर,मुख्याध्यापक: श्रीमती दक्षता दुर्गराम गवस, उपशिक्षिका.आदर्श विद्यार्थी सत्कार पियुष लक्ष्मण जाधव, ईश्वरी शंकर नाईक,शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यावेळी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन म्हणून खालील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.वीरा राजवी घाडी, मानवी महेश घाडी, पार्थ अशोक बोलके,हार्दिक अशोक वरक,स्वरा गोविंद नेर्लेकर,काव्य अमित तळवणेकर,डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सत्कार,प्रज्ञाशोध परीक्षेत चमकदार कामगिरी करणारा विद्यार्थी:हर्ष रवींद्रनाथ गोसावी,अंगणवाडी विद्यार्थि नैतिक निलेश कुंभार तेजल दीपक सावंत या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा राजे प्रतिष्ठान कामगार सेना कडून सत्कार करण्यात येणारं आहे.हा सत्कार समारंभ राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे .


या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष: संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष: मंगेश माणगावकर,सचिव: रामचंद्र कुडाळकर, सहसचिव: कल्याण कदम, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा संपर्कप्रमुख: शिवा गावडे, महिला जिल्हाध्यक्ष: पूजा गावडे, महिला उपाध्यक्ष: पूजा सोस्नुरकर, तालुका अध्यक्ष: संचिता गावडे आणि दर्शना राणे,शहराध्यक्ष: सेजल पेडणेकर,उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या एकमताने हे पुरस्कार आणि सत्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.