सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप
सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या सेवा सहयोग प्रतिष्ठान मार्फत प्रशालेतील १५ विद्यार्थ्यांना या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, पालक-शिक्षक संघाचे सदस्य सिध्देश तेंडोलकर, भगवान रेडकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक फाले म्हणाले की, शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव परिवार सदैव ऋणी राहिल, असे सांगितले. या दातृत्वाबद्दल सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले पर्यवेक्षक विठ्ठल सावंत यांनी आभार व्यक्त केले.







