सिंधुदूर्ग
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेल मध्ये चिखलसदृश माती आल्याने मंगळवारी मध्यरात्री पासून सिंधुदुर्ग मार्गे वाहतूक बंद होती. याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. तब्बल सतरा तासानंतर रेल्वे रुळावर आलेला चिखल साफ करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले असून बुधवारी रात्री ८.३५ मिनिटांनी व्हाया सिंधुदुर्ग मार्ग वाहतुकीस सुरू झाला आहे. चिखल हटविण्यासाठी तब्बल 200 कर्मचारी त्या टनेल मध्ये ठाण मांडून होते. तर रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्या कामावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे आज पासून होणारी रेल्वे वाहतूक व्हाया सिंधुदुर्ग होणार आहे.
पावसाळी हंगामात कोकणात व गोवा भागात कोकण रेल्वेला कोकण रेल्वमार्गावर माती येतं असल्याने मुसळधार पावसाचा मोठा फटका बसतो. तरी पणं कोकण रेल्वेचे अधिकारी प्रशासन व कर्मचारी अथक मेहनत घेउन हा मार्ग मोकळा करतात .







