पत्रकार निलेश परब यांना मातृशोक
न्हावेली । प्रतिनिधी :
न्हावेली टेंववाडी येथील रहिवासी शशिकला शशिकांत परब वय ( ७३ ) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुलगे, सूना, दीर, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. न्हावेलीचे माजी सरपंच व आयुर्वेदिक वैद्य शशिकांत परब उर्फ दादा वेंगुर्लेकर यांची ती पत्नी तर पत्रकार नीलेश परब यांची ती आई होत.







