ठळक घडामोडी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सावंतवाडी बस स्थानकाची पाहणी; २० नव्या बसची घोषणा!

सावंतवाडी:

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज सावंतवाडी दौऱ्यावर आले असता, त्यांनी येथील बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान सावंतवाडीकरांसाठी एक मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून, सावंतवाडी आगाराला २० नवीन गाड्या देणार असल्याचे मंत्री महोदयांनी जाहीर केले आहे.

केसरकरांकडून जंगी स्वागत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सावंतवाडीत आगमन झाल्यानंतर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांनी सावंतवाडी बस स्थानकाची संयुक्त पाहणी केली आणि तेथील प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला.

या प्रसंगी परिवहन मंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि पाहणी दौऱ्यासाठी शिवसेना व स्थानिक प्रशासनातील अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी
संजू परब(शिवसेना जिल्हाप्रमुख),गणेशप्रसाद गवस (दोडामार्ग तालुकाप्रमुख),दिनेश गावडे (सावंतवाडी तालुकाप्रमुख),बाबू कुडतरकर (शहरप्रमुख),अशोक दळवी (माजी जिल्हाप्रमुख),सुस्मिता जाधव (पंचायत समिती सभापती),बबन राणे, शशिकांत गावडे, विनायक म्हाडेश्वर यांच्यासह सावंतवाडीतील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या या धडक निर्णयामुळे आणि २० नवीन बसच्या घोषणेमुळे सावंतवाडी आणि परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांचा दळणवळणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून, स्थानिक नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.