सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख व नगरसेवक ॲड. नीता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक, पंचायत समिती सदस्या प्रणाली टिळवे, अजय गोंदावळे, जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे, शैलेश मेस्त्री, सुनील नाईक, हर्षा जाधव, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, भारती परब, राजश्री निर्गुण, निलम कुमठेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरपालिका सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी आमदार केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.







