ठळक घडामोडी

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प, विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान काही ठिकाणी विद्युत खांब वाकले

तळवडे-होडावडा पंचक्रोशीला वादळी पावसाचा तडाखा; वृक्ष उन्मळून पडल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प, विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान काही ठिकाणी विद्युत खांब वाकले

तळवडे (प्रतिनिधी):
तळवडे-होडावडा पंचक्रोशीत आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान, मुख्य मार्गावर महाकाय वृक्ष कोसळल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
मोठ्या प्रमाणात पडझड आणि आर्थिक नुकसान
आज अचानक आलेल्या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणच्या घरांवरील छप्परे आणि पत्रे उडून गेली. ग्रामीण भागातील उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या आंबा आणि काजू बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंबा आणि काजूची झाडे उन्मळून पडल्याने तसेच फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडीमुळे लोकांचे संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. या या पहिल्याच मुसळधार पाऊससह झालेल्या वादळात विद्युत महामंडळाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे त्यामूळे होडावडे तळवडे पंचक्रोशीत लाईट नाही आहे अनेक ठिकाणी झाडे पडून विद्युत तारा तुटल्या आहेत.