
“सावंतवाडीकर विकले जाणार नाहीत; पैशाचा पाऊस पाडून नेतृत्व संपवण्याचा डाव हाणून पाडा!” आमदार दीपक केसरकर यांचा विरोधकांवर तुफान हल्ला
सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: गांधी चौकातील प्रचारसभेत राजकीय वातावरण तापले.
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर प्रचारसभेत आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले. जिल्ह्याचे नेतृत्व माननिय राणे आणि आपले नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.:या निवडणुकीत पैशाचा पाऊस पाडला जातोय, पण सावंतवाडीची जनता या पैशाला विकली जाणार नाही.” “मला संपवण्यासाठी पैसे वाटता? सावंतवाडीकर कधीच हे सहन करणार नाहीत.”
जनतेला थेट आवाहन: “
कोणी पैसे देत असेल तर घेऊच नका… आणि घेतले तरी त्यांना मत देऊ नका!” मोती तलावाचा मुद्दा राजकीय बाहू म्हणून वापरला जात असल्याचा आरोप. विरोधकांना आव्हान: “हिंमत असेल तर उद्याच मोती तलावाची केस मागे घेऊन दाखवा आणि मग मत मागा! तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही.” नेतृत्व संपवण्याचा डाव:”या जिल्ह्यातून राणेसाहेबांचं आणि माझं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपलेच नेतृत्व तयार करण्याचा डाव रचला जातोय.””तीस वर्ष सत्तेत असूनही सावंतवाडीत कधीही संघर्ष झाला नाही, ना जातीपातीचे राजकारण.”असे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निधी देणार असल्याचा दावा. शहराच्या विकासासाठी नगर विकास खात्याकडून भरघोस निधी दिला आहे. धरणाची उंची वाढवून पाणीप्रश्न सोडवल्याचा दावा.संत गाडगेबाबा भाजी मंडईचे काम वेगाने सुरू आहे.
“या निवडणुकीत विरोधकांना तुमची ताकद दाखवा. आमचे नगरसेवक निवडून द्या आणि स्वच्छ कारभार करणाऱ्या निता ताई सावंत-कविटकर यांना नगराध्यक्ष बनवा.”केसरकर यांच्या या आक्रमक भाषणामुळे सावंतवाडी नगरपरिषदेची निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.







