ठळक घडामोडी

तळवडे येथे लटकणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे एसटी अडकली; दिनेश परब यांच्या प्रसंगावधानामुळे २५ प्रवाशांचा जीव वाचला! जीवितहानी होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण विभागाने तातडीने रस्त्यावरील झाडे-वेली तोडून वीजवाहिन्या मोकळ्या कराव्यात ! दिनेश परब

सावंतवाडी (प्रतिनिधी):

तळवडे-मातोंड मुख्य रस्त्यावरील जुन्या बँक ऑफ इंडियासमोरील मुख्य वीजवाहिनी (मेन लाईन) अत्यंत खाली आल्याने आज एक भीषण अपघात घडता घडता राहिला. रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बसमध्ये ही वीजतार अडकल्याने प्रवाशांमध्ये धादलं उडाली.

मात्र, स्थानिक ग्रामस्थ दिनेश परब यांच्या प्रसंगावधानामुळे व तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, बसमधील २० ते २५ प्रवाशांचे प्राण बालंबाल वाचले आहेत. रस्त्याकडेला वाढलेली झाडे आणि वेली मुख्य वीजवाहिनीवर चढल्यामुळे या तारा अत्यंत खाली आल्या आहेत. आज सकाळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला साईड देताना एसटी बस या लटकणाऱ्या तारेचा जरा संपर्क झाला. यावेळी परिसरात उपस्थित असलेले दिनेश परब यांनी तातडीने प्रसंगावधान राखून पुढील संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी मदत केली. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, भविष्यात कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण विभागाने तातडीने रस्त्यावरील झाडे-वेली तोडून वीजवाहिन्या मोकळ्या व व्यवस्थित कराव्यात, अशी जोरदार मागणी दिनेश वसंत परब (परबवाडी, तळवडे) यांनी ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. फोटो तळवडे येथे लटकणाऱ्या वीजवाहिन्यां याची तातडीने दुरुस्ती व्हावी तळवडेतील ग्रामस्थ दिनेश परब यांनी ग्रामस्थ याच्यावतीने मागणीनिवेदनाद्वारे केली आहे.