ठळक घडामोडी

तळवडे व्यापारीसंघा मार्फत श्रावण सोमवार निमित्त तळवडे गावचे ग्रामदैवतश्री देव सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा सोहळा संपन्न

तळवडे व्यापारीसंघा मार्फत श्रावण सोमवार निमित्त सिद्धेश्वर मंदिरात सत्यनारायण महापूजा

सावंतवाडी

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तळवडे गावाचे ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर मंदिरात तळवडे व्यापारी संघाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सामूहिक 14सत्नारायण महापूजा आयोजित करण्यात आल्या होत्या.


श्रावण महिना हा धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. याच अनुषंगाने, तळवडे व्यापारी संघा मार्फत सर्व व्यापारी बांधव मार्फत सर्व एकत्र येऊन या महापुजेचे आयोजन केले. सकाळी १० वाजता सत्यनारायण महापुजेला सुरुवात झाली. यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करुन सजवण्यात आले होते. पूजेसाठी गावातील अनेक मान्यवर तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना व्यापारी संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, “श्रावण महिन्याचे पावित्र्य , श्रद्धा लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही या पुजेचे आयोजन केले. “
पूजेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ घेतला. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहात या धार्मिक सोहळ्यात सहभाग घेतला. तळवडे व्यापारी संघाच्या या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले. या भव्य आयोजनाबद्दल ग्रामस्थ आणि भाविकांनी व्यापारी संघाचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे धार्मिक आणि सामाजिक सलोखा वाढीस लागत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. तसेच तळवडे देवस्थानं कमिटी याच्या सहकाऱ्याने हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.