ठळक घडामोडी

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क!माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार

माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार

​सावंतवाडी,

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.​ मी या भागातील जनतेचा समस्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहे.. त्यामुळे इथली जनता नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील. असे ते यावेळी म्हणाले.