सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा-तरचावाडा येथील रहिवासी व माजी सैनिक चंद्रकांत पवार यांच्या पत्नी, तसेच ज्येष्ठ पत्रकार हरिश्चंद्र पवार यांच्या मातोश्री सौ. चंद्रावती चंद्रकांत पवार (वय ७९ वर्षे) यांचे मंगळवारी पहाटे सुमारे ६.३५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
प्रेमळ, साधी आणि कुटुंबवत्सल अशी त्यांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी निःस्वार्थपणे झटत प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या मायेच्या सावलीत वाढलेला परिवार आज त्यांच्या जाण्याने अक्षरशः पोरका झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने जोडून ठेवणारा तो धागाच जणू आज तुटला आहे. त्यांच्या शांत, संयमी स्वभावामुळे त्या सर्वांच्या मनात कायमच आदराचे स्थान मिळवून होत्या.
त्यांच्या पश्चात मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांसह विविध स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.







