तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न होणार

तळवडे : प्रतिनिधी
तळवडे येथील ‘तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.’ या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित ‘सुवर्ण महोत्सव सोहळा’ येत्या शुक्रवार, १ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हयातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष
या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी शिक्षणमंत्री श्री. दीपकभाई केसरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी कामत उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष प्रकाश दळवी भूषवणार आहेत.
यासोबतच नाबार्डच्या जिल्हा प्रबंधक श्रीम. दिपाली माळी, जिल्हा उपनिबंधक . श्री. डॉ. सोपान शिंदे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक . श्री. विनोद आंद्रसकर,जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, रविंद्र मडगावकर, महेश सारंग, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव,तळवडे जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे,सहायक निबधक पूजा कापसे,यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि लोकप्रतिनिधी या सोहळ्याला निमंत्रित आहेत.
सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
- सकाळी ९:३० वा. : श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद.
- सायंकाळी ५:३० वा. : मुख्य सुवर्ण महोत्सव सोहळा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन.
- रात्री ७:०० वा. : ‘मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे’ यांचा भव्य नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
हा सोहळा तळवडे विकास सेवा सोसायटी लि., तळवडे (ता. सावंतवाडी) येथे संपन्न होईल.
या सुवर्ण महोत्सव सोहळ्याचा उपस्थित राहावे असे आवाहन सस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव दत्ताराम परब, सचिव श्री. संतोष यशवंत राऊळ, सर्व संचालक, कर्मचारी आणि सभासद यांनी केले आहे.तसेच या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संस्थेच्या या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी तळवडे परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.








