ठळक घडामोडी

भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन

🛑भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन..

◼️रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा.

कुडाळ /- प्रतिनिधी.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड – कुडाळ येथे जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणी चे पदाधीकारी सर्व कार्यकारीणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा हा मालवण तालुक्यातील कट्टा येथील
ओम गणेश साई मंगल हॉल पेट्रोल पंप नजीक कट्टा या ठिकाणी दिनांक 30.05.2026. रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे सर्वाच्या मताने ठरविण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रातील भव्य भंडारी युवक युवती यांच्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या रोजगार मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी युवक आणि युवतीनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडुन आलेले श्री. रुपेश अशोक पावसकर यांचा जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने शाल,श्रीफळ देऊन भंडारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. समिल जळवी, माजी अध्यक्ष जिल्हा सदस्य श्री.रमण वायंगणकर,जिल्हा सदस्य श्री.रुपेश पावसकर,जिल्हा सदस्य सह सचिव श्री. प्रियदर्शन कुडव,जिल्हा सदस्य विकास वैद्य , जिल्हा सदस्य श्री. निलेश गोवेकर, जिल्हा सदस्य श्री.लक्ष्मीकांत मुंडिये, जिल्हा सदस्य श्री.निलेश गोवेकर, जिल्हा सदस्य श्री.भरत आवळे, जिल्हा सदस्य श्री.श्रीकांत वेंगुर्लेकर, जिल्हा सदस्य श्री.विकास वैद्य, जिल्हा सदस्य श्री.प्रवीण आचरेकर, जिल्हा सदस्य श्री.चंदन पांगे,जिल्हा सदस्य श्री. गजानन वेंगुर्लेकर अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त ​भंडारी समाजातील तरुण – तरुणींसाठी मर्यादित..!बँकिंग क्षेत्रातील असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) पदांसाठीची भरती ​सहभागी बँका :

  • AXIS BANK
  • HDFC BANK
  • ICICI BANK

​ यासाठी पात्रता आणि अटी :

  • शिक्षण : कोणत्याही पदवीधर (Graduation) किंवा पदव्युत्तर पदवी (कोणतीही शाखा)
  • अनुभव : फ्रेशर्स आणि अनुभवी दोन्ही पात्र
  • वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे
  • कागदपत्रे : अद्ययावत बायोडाटा (Resume) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे..
    ज्या मुला – मुलींनी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण केली आहे, त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासावर विशेष सत्राचे आयोजनही यावेळी केले जाणार आहे.
    भर्ती प्रक्रिया वैशिष्ट्ये :
  • थेट मुलाखत (लेखी परीक्षा नाही)
  • एकाच दिवसात निवड व त्वरित निकाल
  • प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तात्काळ ऑफर लेटर.​मेळाव्याचे ठिकाण दिनांक :30 मे. 2026 कट्टा, ओम गणेश साई मंगल हॉल,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग.
    नोंदणी कशी करावी..?
    खालील लिंकवर क्लिक करून तुमचा गुगल फॉर्म भरा :
    https://forms.gle/rcamFkj8aMdy3GjQ8

​किंवा अधिक माहितीसाठी संपर्क :करा

  • श्री. हेमंत करंगुटकर – 9423513647
  • श्री.रमण वायंगणकर-9623727920
  • श्री. समील जळवी-9421235508
    •श्री.राजू गवंडे-9067474899
    प्रियदर्शन कुडव.94233 52626
    यांच्या शी संपर्क करावा.